Breaking News

क्रिकेटपटूंना अद्यापही नव्या करारानुसार वेतन नाही


नवी दिल्ली : भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंबाबत सुधारित वेतन करार मार्च महिन्यामध्ये करण्यात आला. मात्र अद्यापही खेळाडूंना या नव्या करारानुसार वेतन मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. भारतीय संघ आजपासून ब्रिटन दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध सामने खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि , करार माझ्याजवळ आहेत. बैठकीत या सुधारीत वेतन कराराला मंजूरी मिळाली, तर मी यावर स्वाक्षरी करेन. पण मंजूरी नाही मिळाली, तर माझे हात बांधलेले असतील. कोणत्याही निर्णयाला साधारण सभेची मंजूरी मिळण्याची आवश्यकता असते आणि मी नियम मोडू शकत नाही.’ त्याचवेळी, प्रशासकीय समितीने याआधीच स्पष्ट केले आहे की, ते अशा बैठकीला मंजूरी देत नाही.

सुधारीत वेतन करारानुसार ‘ए प्लस’ गटातील खेळाडूंना सात करोड, ‘ए’ गटातील खेळाडूंना पाच करोड, ‘बी’ आणि ‘सी’ गट खेळाडूंना अनुक्रमे तीन करोड आणि एक करोड रुपये दिले जाणार आहेत.