Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाची सांगता

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त हरेश्‍वर डोंगरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.