Breaking News

सर्वरोग निदान शिबिर उत्साहात


कोपरगाव शहर प्रतिनिधी

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने सर्वरोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आत्मा मालिक हॉस्पिटलच्या सहकार्याने कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंद विदयालयात झालेले हे शिबिर मोठया उत्साहात पार पडले. विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. स्नेहलता कोल्हे होत्या.

प्रारंभी उदयोजक कैलास ठोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी प्रास्तविक केले. जागतिक योगदिनानिमित्त मुख्याध्यापक जी. एम. शेटे आणि त्यांच्या सहका-यांनी योग प्रशिक्षक प्रसाद घायवट यांच्या मार्गदशर्नाखाली योग केला. याप्रसंगी सचिन अजमेरे, भारती वायखिंडे, मंगल आढाव, दिपा गिरमे, शिल्पा रोहमारे, रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, पराग संधान, नंदकुमार निकुंभ, विवेक सोनवणे, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर आदी उपस्थित होते. येथील प्रसाद पुंडे, साई अमृतकर व विशाल पंडोरे यांनी योग प्रात्याक्षिके करून दाखविली. अध्यक्षपदावरून बोलतांना आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने मतदारसंघाचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना व्यक्तिगतरित्या वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. मात्र वाढदिवसाला सामाजिक उपक्रम घेऊन त्यातून जनतेचे कल्याण व्हावे, त्यांचा हा हेतु प्रामाणिकपणे जपण्यासाठी सर्व कार्यकर्ते काम करतात. ‘आत्मा मालिक’चे डाॅ. गोरे, डाॅ. पुरकर डाॅ. भांगे. डाॅ. तिरमखे, डाॅ. पाटील यांनी सदृढ आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुपसुंदर, गोरे, इनामदार आदी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.