खडकाफाटा रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक दरोड्याचा साहित्यासह एक ट्रॅक्टर व पाच मोटारसायकली हस्तगत
नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन ऑइल मिल जवळ एक झुडपाच्या आडोशाला लपून बसलेले दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर एक जण पसार झाला. अमित अशोक नगरे (वय-21) रा. खंडोबा मंदिराजवळ खुपटी रोड नेवासा,
उमेश सूर्यभान राठोड (वय-24) रा.संजय नगर मुकुंदवाडी जि. औरंगाबाद, गणेश रामभाऊ ढोकणे (वय-29) रा. शेंडे गल्ली.नेवासा , फैजल सादिक देशमुख (वय21) रा.कडूगल्ली.नेवासा यांना ताब्यात घेतले तर संदीप बोडखे रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर हा फरार झाला असून दरोडेखोरांकडून कुर्हाड, लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड, स्क्रुड्रायव्हर व पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
पोलीस कर्मचारी महेश कचे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पो.ना. भीम पवार, जयवंत तोडमल, राहुल यादव, वसीम इनामदार, सरकारी वाहनातून नेवासा परिसरात गस्त घालत असतांना पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना गुप्त महिती मिळाली की, नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन ऑइल मिल जवळ एक झुडपाच्या आडोशाला चार ते पाच जण इसम चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले ओहेत . ते तेथे गेले असता त्यांची खात्री झाली व त्यांनी चार जणांना पकडले मात्र एक जण तेथून पसार झाला.
याबाबत तपासाला वेग देऊन सखोल तपास केला असता यातील आरोपींकडून पोलीस हेड. कॉ. विठ्ठल गायकवाड, संदीप दरंदले, सुहास गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे यांनी एक ट्रॅक्टर व तीन मोटारसायकली असा अंदाजे आठ ते नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची श्यक्यता असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. वरील पाच जणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो .ना. तोडमल करीत आहेत.