Breaking News

मुंबई साबां अधिक्षक अभियंतापदावर नाना पवार? भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांसाठी सुर्यवंशींना बकरा बनविण्याची तयारी

मुंबई/ विशेष प्रतिनिधी
मंञालयातील डेब्रीज घोटाळ्याचा खोटा चौकशी अहवाल देण्यास नकार देणारे मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना बळीचा बकरा बनविण्याच्या हालचाली गतीमान झाल्या असून त्यांचा पदभार नाना पवार यांना देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या संदर्भात दै.लोकमंथनने कालच्या अंकात संबंधित वृत्त प्रसिध्द केले होते,काही तासात त्या वृत्ताला नाना पवार यांच्या नियुक्तीने दुजोरा मिळाल्याची चर्चा होती.तथापी काही काळासाठी हा आदेश फ्रिज केल्याचे वृत्त आहे.दरम्यान अरविंद सुर्यवंशी यांच्या गळ्यात अडकलेला डेब्रीजचा धोंडा नाना पवार यांच्या गळ्यात अडकावला गेल्यास त्यांची कसोटी लागणार असल्याची चर्चा साबांत आहे. नाना पवार यांनी प्रकरणातील मुख्य संशयीत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना वाचविण्याचा नसता खटाटोप करीत मैञीचे दायीत्व निभावले तर चाळीस आमदारांच्या रोषाला बळी पडण्याची नौबत ओढावून सेवानिवृत्त्तीनंतर नसते बालंट येईल असा सावधागीरीचा सल्ला साबांतील जेष्ठ अनुभवी देऊ लागले आहेत.श्रशरव
सन 2014-15,2015-16 आणि 2016-17 या तीन आर्थिक वर्षात शहर इलाखा साबां अंतर्गत मंञालय इमारतीच्या कामात प्रचंड घोळ झाला आहे.तत्कालीन कार्यकारी अ भियंता रणजीत हांडे,प्रज्ञा वाळके यांच्यावर या अपहाराचा ठपका ठेवला जात आहे.अशाच एका प्रकरणात प्रज्ञा वाळके यांच्यासह त्यांचे दोन सहअभियंता निलंबीत झाले आहेत.या प्रकरणाची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आणि मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी केली होती. या दोघांनीही वस्तुनिष्ठ अहवाल दिल्याने कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि दोन सहअभियंत्यांवर दोषारोप सिध्द झाला.
वाळके प्रकरणानंतर मंञालय इमारतीतील डेब्रीज घोटाळा आ.चरणाभाऊ वाघमारे यांच्यासह जवळपास चाळीस विधीमंडळ सदस्यांनी डेब्रीजसह मंञालय इमारतीशी संबंधित अन्य घोटाळ्यांना प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे.दुसर्या बाजुला मुख्यमंञ्यांच्या पारदर्शक भुमिकेला छेद देणारे हे प्रकरण मुख्यमंञी कार्यालयाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे बनले आहे.एकूणच 900 ट्रक्स डेब्रीज,सहाव्या मजल्यावरील 618 क्रमांकाचे दालन दुरूस्ती ,आठशे तीस मजूरांचा मंञालयात एकाच दिवशी दाखवलेला राबता विक्षिप्त आणि अपहारी मनोवृत्तीचे लक्षण असल्याचे स्पष्ट दिसत असताना या प्रकरणात संशय व्यक्त होत असणारे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांना क्लीन चीट देण्यासाठी साबां प्रशासनातील एक लाबी क्रियाशील बनलेली असताना मुख्यमंञी कार्यालयातून चौकशीचा रेटा कायम राहीला.परिणामी 618 क्रमांकाच्या दालनाची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना तर डेब्रीज प्रकरणाची चौकशी मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आली.धनंजय चामलवार यांनी केलेल्या चौकशीत 618 क्रमांकाच्या दालनावर सहा लाखाचाही खर्च झाल्याचे दिसत नसताना रणजीत हांडे 46 लाख रूपये खर्च दाखविल्याचे प्रथम पाहणीत निष्पन्न झाल्याची चर्चा हांडे लॉबी धक्का देणारी ठरली.त्याचवेळी डेब्रीज प्रकरणाची चौकशी करीत असलेले अरविंद यांनी रणजीत हांडे यांनी नोंद केल्याप्रमाणे 900 गाड्या डेब्रीजचा अहवाल द्यावा असा दबाव सुरू झाला.तथापी डेब्रीजच्या शंभर गाड्याही दाखवणे शक्य नसताना 900 गाड्या कशा दाखवायच्या? असा प्रतीसवाल उपस्थित करून सुर्यवंशी यांनी डेब्रीजचा चौकशी अहवाल मॅनेज करण्यास स्पष्ट नकार दिला.
अरविंद सुर्यवंशी यांच्याकडून पदभार काढून घेत त्यांच्या जागेवर आपला माणूस बसविल्याशिवाय मनासारखा खोटा अहवाल तयार करता येणार नाही याची खाञी पटल्यानंतर त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या.या लॉबीच्या दृष्टीने आपला माणूस या संकल्पनेत बसणारे नाना पवार आणि किशोर पाटील ही नावे सुर्यवंशी यांना पर्याय म्हणून चर्चेत होती.तथापी किशोर पाटील यांना बढती मिळून प्रक्रीया पुर्ण होण्यापर्यंत रिस्क घ्यायची नसल्याने नाना पवार यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला आणि मुंबई साबां अधिक्षक अभियंता म्हणून त्यांची पदस्थापना करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त असले तरी अद्याप आदेश काढण्याचे धाडस दाखवले गेले नाही.
साबां सुञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार नाना पवार हे सरकारमधील एका घटक पक्षावर निष्ठा असलेले अभियंता असून डेब्रीज घोटाळ्यातील संशयीत रणजीत हांडे यांचे मिञ आहेत.हे बेरजेचे समिकरण विचारात घेऊन नाना पवार यांच्यावर डेब्रीज चौकशीचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते असा कयास आहे.
तथापी या नव्या बदलामुळे अरविंद सुर्यवंशी यांच्या गळ्यात अडकलेले डेब्रीजचे लोढणे नाना पवार यांच्या खांद्यावर ठेवले गेले तर पवार यांची कसोटी लागणार आहे.
नाना पवार यांनी सुर्यवंशी यांच्याप्रमाणे स्पष्ट भुमिका घेऊन सुर्य आणि जयद्रथ दाखवावे.मैञी आणि कर्तव्य यांची भेसळ करू नये.या डेब्रीज प्रकरणात आ.चरणभाऊ वाघमारे आणि अन्य चाळीस लोकप्रतिनिधींच्या अधिकाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.सत्य दडपून मैञी निभावण्याचा प्रयत्न नाना पवार यांच्या भविष्यासाठी घातक ठरून घोटाळेखोरांना पाठीशी घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाऊ शकतो.म्हणून लोकप्रतिनिधींच्या नाराजीचे निमित्त ठरू नये असा सबूरीचा सल्ला साबांतील जेष्ठ अनुभवी देऊ लागले आहेत.