अमृतवाहिनी’चा गुणवत्तेत देशात ८ वा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर झाला गौरव
संगमनेर प्रतिनिधी
आधुनिक पध्दतीने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार तंत्रशिक्षणाची देणार्या देश पातळीवरील अव्वल महाविद्यालयांत यावर्षीही माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गुणवत्तेमुळे देशात ८ वा क्रमांक मिळविला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.
कॉम्पिटीशन सक्सेस रिव्ह्यू (सी. एस. आर. जी. एच. आर. डी. सी. सर्व्हे) या अग्रगण्य मासिकाच्यावतीने यासाठी सर्व्हे घेण्यात आला होता. या सर्व्हेनुसार देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत ‘अमृतवाहिनी’ला उत्कृष्टतेबाबत देशात ८ वा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील टॉपटेन महाविद्यालयांमध्ये अमृतवाहिनीला स्थान मिळाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त आ. डॉ. सुधीर तांबे यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश आणि सर्व विभाग प्रमुख यांचा सत्कार केला़. अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात कार्यरत आहेत. त्यांचे सी. एस. आर. इंजिनिअरींग कॉलेज सर्व्हे टिमचे व्यवस्थापकीय संचालक मेखला सिन्हा आणि प्रोजेक्ट स्टाफ टिम यांनी देशभरातील विविध महाविद्यालयांचे मूल्यमापन केले़.
या गौरवाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षण व महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब गुंजाळ, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, विश्वस्त शरयु देशमुख, अॅड. आर. बी. सोनवणे यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य. डॉ. एम. ए. व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी धुमाळ, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी़. वाघे आदींसह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.