Breaking News

शिक्षकांनी सामाजिक कृतज्ञतेची भावना जपली : आ. औटी


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागास विविध प्रकारचे साहित्य भेट देऊन शिक्षकांनी सामाजिक उपक्रम राबवून कृतज्ञतेची भावना जपल्याचे गौरवोद्गार आ. विजय औटी यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा पारनेर आणि गुरुमाऊली मंडळद्वारा आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग पारनेर यांस जलशुद्धीकरण यंत्रणा, संगणक व इतर साहित्य प्रदान कार्यक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम जुनी पंचायत समिती येथे पार पडला.अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले होते. यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले, पं.स. सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, पं.स.सदस्या ताराबाई चौधरी, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे, प्रविण ठुबे, आबासाहेब जगताप, संजय शिंदे, अविनाश निंभोरे, आर.टी. साबळे, बाबा औटी यांसह शिक्षक उपस्थित होते.