हंगामातील शेवटचे आवर्तन सोडण्यात आले
अकोले / प्रतिनिधी
निळवंडे धरणातून आज दुपारी 12 वाजता 1500 क्युसेक्सने शेतीचे या हंगामातील शेतीचे या हंगामातील शेवटचे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकरी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख म्हणाले की, उन्हाळ्यातील हे तिसरे आवर्तन असून आतापर्यंत खरीपमध्ये 1, रब्बीचे 2, उन्हाळ्याचे 2 आणि प्रवरा नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी असे एकूण 6 आवर्तने सोडण्यात आली. सध्याचे आवर्तन हे साधारण 26 ते 28 दिवस सुरु राहील - अंदाजे 3 हजार द.ल.घ.फु पाण्याचा वापर होईल. भंडारदरा धरणातून एक दिवस अगोदर 1600 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या भंडारदरा धरणात 3326 द.ल.घ.फु इतका पाणी साठा शिल्लक आहे. निळवंडे धरणात 617 द.ल.घ.फु पाणी साठा शिल्लक आहे. तसेच यांत्रिकी विभागामार्फत निळवंडे गेटचे काम सुरु होते. म्हणून आवर्तन सोडण्यात उशीर झाल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
