संपत्ती महत्वाची नसून संस्कार महत्वाचे : इंदोरीकर
सुपा / प्रतिनिधी
मुलांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार करावे म्हणजे पुढे ते घराचे, गावाचे व देशाचे नाव उज्वल करतील. अशा संस्कारक्षम मुलांमुळे भविष्यात चांगला समाज घडेल. केवळ पैसा, संपत्ती ही महत्वाची नसून संस्कार महत्वाचे आहेत, त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करा, असा उपदेश कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी श्री क्षेत्र कळमकरवाडी येथे दिला.
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कळमकरवाडी येथील श्री दत्त मंदिराचा कलशारोहन व उद्घाटन तथा पंचावतार उपहार सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात महाराज बोलत होते. महाराजांचे कीर्तनातील बोल मनात साठवून ठेवण्यासाठी भाविकांची अमाप गर्दी उसळली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं सदस्य शहाजी कळमकर, रामदास कळमकर, संतोष कळमकर, भाऊसाहेब कळमकर, साहेबराव कळमकर, रघुनाथ कळमकर, राजू कळमकर, संजय कळमकर, बापूराव कळमकर, भानुदास कळमकर, गोविंद कळमकर, गणेश कळमकर, भाऊसाहेब औटी, यांचेसह सर्व महानुभाव पंथीय कळमकरवाड़ी ग्रामस्थ व शिवतेज कला क्रीड़ा मंडळाने परिश्रम घेतले.
