Breaking News

पहिल्याच पावसात वरूर येथील बंधाऱ्याला मोठे भगदाड


वरुर/ प्रतिनिधी  
शेवगाव तालुक्यातील वरूर येथील 'नानी' नदीवरील बंधाऱ्याला पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तर बंधाऱ्याच्या लगतच्या जमिनीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सुमारे दोन वर्षापासून बंधाऱ्याचे काम चालू असून तेही अर्धवट अवस्थेतच आहे . मागील आठवड्यातच बंधाऱ्या लगतच्या शेतकर्‍यांनी बंधाऱ्याविषयी तक्रारी केल्या होत्या. परंतु या बंधाऱ्याकडे कुठलाही अधिकारी फिरकला नसून बंधा-याच्या कामात मोठी अनियमितता झाली आहे . असा आरोप शेतकरी करत आहेत. तर शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेला तिलांजली देण्याचाच हा प्रकार आहे . पहिल्याच पावसाने बंधाऱ्याला मोठे भगदाड पडल्याने नेमका बंधारा पाणी अडवण्यासाठी केला होता का पैसा जिरवण्यासाठी याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे ? दरम्यान शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत कारण अर्धवट बंधाऱ्याच्या कामाने पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम कितपत सफल होईल यामध्ये पाणी खरंच पाणी अडवता येईल का शासन फक्त शेतकऱ्यांची थट्टा करतेय हे ही समजायला मार्ग नाही तर अधिकारी ठेकेदारांना विचारायला गेल्यास ते शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरतात मग दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल शेतकरी विचारत आहेत . दरम्यान जलसंपदा विभागाने यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना याविषयी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, दादासाहेब पाचरणे, संतोष गायकवाड, भिमराज भडके, मच्छिंद्र आर्ले, महेश घोडसे यांनी दिला आहे‌.

 वरुर येथील नाणी नदीवर शासनाच्या स्थानिक स्तर अंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाची संबंधितावर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.