Breaking News

आयुष्याचे निश्‍चित ध्येय ठेवून कष्ट आणि नियोजन - डॉ.सुभाष भामरे


पुणे - कोणत्याही देशाची गुणवत्ता हि तिथल्या युवकांवर ठरवली जाते, भारतात युवकांची असणरी सर्वाधिक संख्या हि भारताची ताकद आहे आहे. प्रत्येक तरुणाने आपल्या आयुष्याचे निश्‍चित ध्येय ठेवून कष्ट आणि नियोजन केल्यास काहीही मिळवणे अशक्य नाही असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज पुण्यात केले.
सिम्बायोसिस इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने आज फिल्ड मार्शल सॅम मानेकशा स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, डॉ. भामरे यांनी यावेळी ‘राष्ट्रनिर्माणात युवकांची भू मिका’ याविषयावर व्याख्यान दिले. याप्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब मुजुमदार उपस्थित होते.
ते म्हणाले, समस्या सर्वांना येतात त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. ज्यांच्याकडे आहे,त्यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून झटले पाहिजे. त्याचप्रमाणे करीयरसाठी परदेशात स्थायिक होणे हे सर्वाधिक सुरक्षित असते या युवकांच्या मनस्थितीबाबत त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली.
युवकांनी नोकरी न मागता नोकरी देणारे व्हावे यासाठी सरकारने अटल टिंकरिंग योजना, मुद्रा, स्टँड इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया यासारख्या योजना सुरु केल्या असल्याचेही डॉ. भामरे यावेळी म्हणाले.