Breaking News

अमळनेर येथे रस्त्यावर दूध भाजीपाला फेकून शासनाचा निषेध

जळगाव, दि. 03, जून - अमळनेर येथील शेतक-यांनी संपाच्या दुस-या तहसील कार्यालयाबाहेर दूध, कांदे, टमाटे व भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला. तसेच काही काळासाठी रस्ता रोकोही करण्यात आला होता.

राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी शनिवारी तहसील कचेरीसमोर रस्ता रोको करून निषेध म्हणून दूध, कांदे, टमाटे, भाजीपाला रस्त्यावर फेकले. त्यानंतर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सरसकट कर्जमाफी, उत्पन्नाची हमी, शेतक-यांना पेन्शन द्यावे , शेती पंपासाठी मोफत वीज द्यावी बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता द्यावी या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.