हॉटेल आर.के वर पोलिसांचा छापा; 54 हजारांची विदेशी बनावटीची दारू जप्त
श्रीगोंदा / प्रतिनिधी
शहरातील श्रीगोंदा-काष्टी रस्त्यावरील हॉटेल आर.के. वर पोलिसांनी छापा टाकून विदेशी बनावटीची जवळपास 54 हजार 335 रुपये किमतीची दारू जप्त केली. पो.नि. बाजीराव पोवार यांच्या सूचनेनुसार कालरोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याबाबत माहिती अशी की, आज रमजान ईद असल्यामुळे ड्राय डे असूनदेखील काष्टी रस्त्यावरील हॉटेल आर.के वर दारू विक्री सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत श्रीगोंदा पो. नि. बाजीराव पोवार यांना मिळाली, त्यामुळे पोवार यांनी तातडीने पोलिसांना सदर हॉटेलवर छापा टाकण्यास सांगितले. श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पो. ना. बबन तमनर, पो. कॉ. दहिफळे, ज्ञानेश्वर पठारे, संतोष कोपनर, भारत खारतोडे, संजय कोतकर, अमोल आजबे, अविनाश ढेरे, रवी जाधव या पोलीस पथकाने हॉटेल आर.के वर छापा टाकत विदेशी बनावटीची 54 हजार 335 रुपये किंमतीची दारू जप्त केली असून, हॉटेल मधील पांडुरंग हिरामण पवार यास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या छाप्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
