जात वैधता पडताळणीसाठी बार्टीतर्फे विशेष मोहीम
पुणे : अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बाटीतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, व्यावसायिक अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता अतसे. या प्रमाणपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकताच दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. परिणामी, बार्टी अंतर्गत अनुसूूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कारणांसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली या विभागातून अर्ज येत आहेत.विद्यार्थ्यांच्या भवितवयाच्या दृष्टीने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र त्वरित मिळण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत् अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना श-ढीळलश’ पोर्टलवर हीींिीं://ुुु.शीींळलर्शींरश्रळवीूं.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप वरून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर वैधता प्रमाणात देण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बार्टीच्या दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी विशेष कक्षामार्फत माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती बार्टी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.