राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतला !
राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचं ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केलं. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.
सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचं पहायला मिळालं.
