Breaking News

‘वंचित बहूजन आघाडी’ स्थापन करणार भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे संकेत


पुणे - आगामी निवडणूकांमध्ये समविचारी पुरोगामी पक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन करणार असल्याचे संकेत भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी दिले. ते पुणे येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 
या आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचा पेशवाईला व पेशवाई पगडीलाही विरोध आहे. त्यामुळे शरद पवार यांनी फुले पगडी स्वीकारली याचा आनंदच आहे. अशी त्यांनी पुणेरी पगडीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेबाबत लक्ष्मण माने, हरिभाऊ बधे, विजय मोरे यासह विविध संघटनांचे नेते कार्यकर्त्यांच्या एकत्र बैठकीत निर्णय घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहचली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सां गितले. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरा केला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच राज्यात चार ते पाच ठिकाणी परिषदा घेण्यात येतील, अशीही त्यांनी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांचा पावसाळी नागपूर अधिवेशनाला विरोध आहे. शिवसेना या अधिवेशनाला जर गेली नाही तर हे सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे क ाश्मीरसारखी स्थिती महाराष्ट्रात होईल का हे अधिवेशनावेळी कळेल, असे त्यांनी मत व्यक्त केले. 
आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, ’वंचित बहुजन आघाडी’ बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मेहबूबा मुफ्ती सरकारचं जे जम्मू काश्मीरमध्ये झालं तेच महाराष्ट्रातही होईल. पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यावं अशी शिवसेनची भूमिका आहे, तर अधिवेशन नागपूरला घ्यावं यासाठी भाजप आग्रही आहे. या वादातून शिवसेना पावसाळी अ धिवेशनाला गेली नाही तर हे सरकार अल्पमतात येईल’, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, ’मी शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत. मात्र त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी आहेत. पण त्यांनी त्यांच्या काही भूमिकांमध्ये सुधारणा क रायला हव्या. शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी स्वीकारली याचा आम्हाला आनंद असल्याचे मत देखील आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.