Breaking News

ससूनच्या परिचारिकांचा संप स्थगित

पुणे : बदल्या रद्द कराव्या, या प्रमुख मागण्यासाठी सुरू करण्यात आलेले कामबंद आंदोलन आज सकाळी अकरा वाजता मागे घेण्यात आले. येत्या आठ दिवसात बदल्या रद्द झाल्या नाही तर पुन्हा संप करण्यात यईल असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन या संघटनेने दिला आहे. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी शासनाकडे बदल्या रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आला. असा इशारा महाराष्ट्र नर्स फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी दिला आहे. आज सकाळपासून ससूनमधील सर्व 450 परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे रुग्णसेवा खोळंबली होती. पण प्रशासनाने तातडीने पावले उचलत हा संप स्थगित केल्यानंतर पुन्हा स्थिती पूर्ववत आली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर असतानाच आता ससूनमधील सर्वच 450 परिचारिकांनी आजपासून (दि. 18) संपामध्ये उडी घेतली आहे. दहा परिचारिकांची आकसातून बदली केली असून ती रद्द करावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. प्र शिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपामुळे आगोदरच कोलमडलेली रुग्णसेवा आज अधिकच बिकट होणार आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन हे सहा हजारावरुन 17 हजार करावे या मागणीसाठी ससूनमधील दोनशे डॉक्टरांसह राज्यातील अडीच हजार डॉक्टर 13 जूनपासून संपावर आहेत. हा संप मिटला नसताना तीनही पाळ्यांमधील काम करणा-या परिचारिकांनी संपाची घोषणा केल्याने ससूनचे प्रशासन कात्रीत सापडले आहे. रुग्णांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये सुश्रृशा करण्याचा परिचारिकांचा महत्वाची भूमिका असते. मात्र संपामुळे रुग्णांचे अधिकच हाल होणार आहेत. येथील दहा परिचारिकांची बदली ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी केली.  यामध्ये संघटनेच्या पदाधिका-यांना लक्ष्य केले आहे. याबाबत प्रशानापासून मंत्र्यांपर्यंत बदली रद्द करण्यासाठी विनंत्याही केल्या, परंतु बदली रद्द झाली नाही. सध्या ससूनमध्ये 600 परिचारिकांच्या जागा आहेत त्यापैकी काही रिक्त तर काही सुट्टीवर असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.