Breaking News

देशभरात सुरु होणार 25 हजार नवे पेट्रोल पंप

नवी दिल्ली : देशातील सरकारी तेल कंपन्या एकाच वेळेस 25 हजार नवे पेट्रोल पंप उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोप पंपाच्या डीलर शिपसाठी नियुक्ती करण्यासाठी असलेली पॉलिसी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांना मागणीनुसार आपल्या नियमांमध्ये बदल करता येणार आहेत. तसेच नवे पेट्रोल पंप उघडण्याची स्वातंत्रता मिळणार आहे. मंत्रालयाने गेल्या महिन्यात तेल कंपन्यांना पेट्रोप पंप डीलर्सच्या नियुक्तीसाठी गाईडलाईन्स बनवण्यास सांगितलं होतं. त्यावर कंपन्यांनी सरकारला सांगितलं की, पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर असलेलं नियंत्रण हटल्यावर डीलर्सच्या नियुक्तीसाठी सरकारी गाईडलाईन्सची आवश्यकता लागणार नाही. तसेच कंपन्यांनीही नव्या डीलरच्या निवडीसाठी आपले नियम आणि अटी तयार केल्या आहेत. इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील महिन्याभरात तिन्ही तेल कंपन्या देशभरात 25 हजार ठिकाणी पेट्रोप पंप सुरु करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध क रणार आहे. तसेच इच्छुकांकडून अर्ज मागवणार आहे. यामध्ये बहुतांश पेट्रोल पंप ग्रामिण भागात असणार आहे. देशभरात सध्या 57 हजार पेट्रोल पंप सरकारी कंपन्यांचे आहेत आणि 6 हजार पेट्रोल पंप प्रायव्हेट कंपन्यांचे आहेत.