विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असताना आता सिलेंडरच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. अनुदानित सिलेंडरचा दर 2 रुपये 33 पैसे, तर विनाअनुदानित सिलेंडरचा दर 48 रुपयांनी वधारला आहे. देशातील 81 टक्के कुटुंबं सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. मुंबईमध्ये अनुदानित एलपीजी गॅसची किंमत 481.84 रुपये तर विना-अनुदानित गॅसची किंमत 671.50 रुपये झाली आहे. राजधानी दिल्लीत अनुदानित गॅस 2.34 रुपयांनी तर विना-अनुदानित गॅस 48 रुपयांनी वाढला आहे. दिल्लीत विना-अनुदानित गॅसची किंमत 698.50 रुपये आणि अनुदानित गॅसची किंमत 493.55 रुपये आहे. कोलकात्यामध्ये विना- अनुदानित गॅसची किंमत 723.50 आणि अनुदानित गॅसची किंमत 496.65 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये विना-अनुदानित आणि अनुदानित गॅसच्या किंमती अनुक्रमे 712.50 आणि 481.84 रुपये आहेत. सतत 16 दिवस इंधनांच्या किमतीत दरवाढ केल्यानंतर 30 मे रोजी इंधन दरात कपात करण्यात आली. शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत 5 पैशांनी तर डिझेलच्या दरात 6 पैशांनी कपात करण्यात आली.