Breaking News

नाशकात लष्कराचे सुखोई विमान कोसळले

नाशिक : भारतीय हवाई दलाचे सुखोई 30-210 हे लढाऊ विमान बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळगावच्या शिरवाडे वणी येथे कोसळले. वैमानिकांनी इमर्जन्सी पायलट स्वीचद्वारे सुरक्षित लँडींग केल्याने जीवितहानी टळली. ओझर येथील ‘एचएएल’च्या हवाई तळावरून नियमित सरावासाठी विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड जाणवल्याने वैमानिकांनी नियंत्रण कक्षाला याविषयी संदेश दिल्याचे वृत्त आहे. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती ॠएचएएल’कडून मिळालेली नाही.परंतु, या घटनेनंतर लष्करी अधिकारी आणि नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.