महिला उद्योजिकांसाठी मुंबईमध्ये बुधवारी राज्यस्तरीय चर्चासत्र
या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र महिला उद्योग धोरण २०१७, यशस्वी महिला उद्योजिकांच्या यशोगाथा, विविध उद्योगाच्या उपलब्ध संधी, ग्रामीण उद्योग, वित्तीय सहाय्य, बाजारपेठ व निर्यात संधी या विषयांवर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश नि:शुल्क असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणीhttp://workshop.doattend.com या संकेतस्थळावर करावी.
अधिक माहितीसाठी उद्योग संचालनालय, दुसरा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-३२, दूरध्वनी : ०२२-२२०२९००९, jtdir.industry@maharashtra.gov.in यावर संपर्क करावा.
