Breaking News

सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत मोरेेंकडून संस्थेस एक लाखाची देणगी

कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य चंद्रकांत मोरे तसेच उपशिक्षक हसन सय्यद यांचा सेवापुर्ती सोहळा मंगळवारी संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
उपशिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य चंद्रकांत चेडे, माजी जि.प. सदस्य संभाजी राजेभोसले, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, ज्ञानदेव मोरे, केंद्रप्रमुख मधुकर ओहोळ, भा.कों. साळवे, भाऊसाहेब कचरे, युक्रांदचे आप्पा अनारसे, मुख्याध्यापक सुर्यभान सुद्रिक, बाळासाहेब कळसकर, बाळासाहेब खंडागळे, राम पाटील, बाळासाहेब वाघ, कैलास काकडे, रामराव भोसले, बापुराव गायकवाड, माजी पं. स. सदस्य आण्णा मोरे, मारुती सायकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. उद्योजक मालोजी काकडे, युन्नुस सय्यद, माणिक म्हस्के, गोरख मोरे, सोमनाथ वाघमारे, उदयसिंह मोरे, कुमार कापसे, सुरेश पवार, अनंत आशा प्रतिष्ठानचे निलेश निकम, युवा नेते सतिश मोरे, ग्रा. सदस्य बाळासाहेब मोरे, सचिन मोरे, प्रा. सोमनाथ गोडसे, विजय सोनवणे, तात्यासाहेब ढवाण, शहाजी खराडे, विनोद भांडवलकर, प्रकाश नलगे, रामदास महाराज मोरे, महेश मोरे, तुषार मोरे, संदीप आगवण, दिपक कांबळे, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. 1998 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त सेवक, प्राचार्य तसेच डॉ. सप्तर्षी यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.
सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य चंद्रकांत मोरे यांनी विद्यालयात 10 वी तसेच 12 वीच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमांक संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी एक लाख एकशे एक रुपयांची तरतूद करत संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचेकडे या रकमेचा चेक सुपूर्द केला.
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांनी संस्थेसाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेत, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. निष्कलंक राहुन सेवापुर्ती होणे हे सेवकांसाठी महत्वाचे असते. प्राचार्य चंद्रकांत मोरे हे कमी बोलणारे मात्र, मनाला पंख असणारे होते. त्यांनी विचारात स्पष्टता ठेवत संस्थेत काम केले.त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही लोकल वारसदार म्हणून काम पहावे अशी भावना डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केली. सुत्रसंचालन प्रा. किरण जगताप, गोरक्ष भापकर यांनी तर, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे यांनी आभार मानले.

डॉ. सप्तर्षी यांच्या विश्‍वासास पात्र ठरलो
गावात शाळा सुरु करण्याचा विचार होता, मात्र ते शक्य झाले नाही.पुढे डॉ. सप्तर्षी यांच्या माध्यमातून खेड येथेच सेवा करण्याची संधी मिळाली. डॉ. सप्तर्षी यांच्या विश्‍वासास पात्र ठरल्याने प्राचार्य पदाच्या काळात चांगले काम करता आल्याची भावना चंद्रकांत मोरे यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.