Breaking News

सर्व पात्र शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्‍ये सक्रीय सहभाग नोंदवून, मजबूत लोकशाहीसाठी योगदान दयावे- जिल्‍हाधिकारी राहूल द्विवेदी


नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2018 च्‍या मतदान प्रक्रियेबाबत मतदारांमध्‍ये जागृती करण्‍यासाठी उपक्रम जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यांमध्‍ये तहसिलस्‍तरावरुन राबविले जाणार असून, त्‍यामध्‍ये पसंतीक्रम पध्‍दतीच्‍या मतदानाबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. सर्व पात्र शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्‍ये सक्रीय सहभाग नोंदवून, मजबूत लोकशाहीसाठी योगदान दयावे, असे आवाहन अहमदनगर जिल्‍हा निवडणूक प्रशासनाकडून जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्‍ली यांनी दि.24 मे 2018 रोजीच्‍या पत्रान्‍वये महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2018 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया जिल्‍हयातील 20 मतदान केंद्रांवर सोमवार दि.25 जून 2018 रोजी पार पडणार आहे. सदर मतदान प्रक्रियेकरीता कालावधी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 असा होता. तथापि मा.मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य यांचेकडील दि.13 जून 2018 रोजीच्‍या पत्रांन्‍वये मतदानाचा कालावधी दोन तासांनी वाढविण्‍यात आलेला असून, मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 अशी राहील. वाढविण्‍यात आलेल्‍या मतदानाच्‍या कालावधीबाबत सर्व मतदार, राजकीय पक्ष, अहमदनगर जिल्‍हयातून निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी नोंद घ्‍यावी.

भारत निवडणूक आयोगाकडील दि.6 जून 2018 रोजीच्‍या आदेशान्‍वये सदर निवडणुकीसाठी मतदानाचा हक्‍क बजावितांना मतदारांनी सादर करावयाच्‍या ओळखीच्‍या पुराव्‍यांची यादी जाहिर केलेली असून, महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2018 करीता मतदान करण्‍यासाठी मतदार छायाचित्र मतदार ओळखत्रा व्‍यतिरीक्‍त (EPIC) खालील नमुद ओळखीच्‍या पुराव्‍यांपैकी एक पुरावा मतदान केंदाध्‍यक्ष यांचेकडेस सादर करुन आपला मतदानाचा हक्‍क बजावू शकेल.

1. पासपोर्ट 2. वाहन परवाना.3. पॅन कार्ड 4. पदवी/प‍दविका प्रमाणपत्र. 5. छायाचित्र असलेले शासकीय नोकरदाराचे ओळखपत्र. 6. छायाचित्र असलेले बॅंक/पोस्‍टाचे पासबूक. (दि.31/05/2018 पूर्वी निर्गमित केलेली) 7. मालमत्‍तेचे हस्‍तांतरण नोंदणीकृत दस्‍तावेज (छायाचित्र असलेले). 8. छायाचित्र असलेली शिधापत्रिका (दि.31/05/2018 पूर्वी निर्गमित केलेली) 9.अ.जा./अ.ज./इ.मा.व. जातीची छायाचित्र असलेली प्रमाणपत्रे (दि.31/05/2018 पूर्वी निर्गमित केलेली) 10. छायाचित्र असलेला शस्‍त्र परवाना. (दि.31/05/2018 पूर्वी निर्गमित केलेली) 11.छायाचित्र असलेले अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र (दि.31/05/2018 पूर्वी निर्गमित केलेली) 12. आधार कार्ड. 13. राष्‍ट्रीय जनगणना नोंदवहीतील स्‍मार्ट कार्ड.

या निवडणुकीकरीता आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी व मतदान प्रक्रिये दरम्‍यान कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी अहमदनगर जिल्‍हयातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक दि.14 जून 2018 रोजी पार पडली असून, मतदान प्रक्रियेच्‍या विविध प्रयोजनांच्‍या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्‍त पुरविण्‍याचे निर्देश पोलीस प्रशासनास देण्‍यात आलेले आहेत. सदर निवडणुकीच्‍या अनुषंगाने दि.24 जून 2018 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपासून ते दि.25 जून 2018 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आणि मतमोजणी दिनांक 28 जून 2018 रोजी सकाळी 7 .00 ते संध्‍याकाळी 5.00 वाजेपर्यंत “ कोरडा दिवस ” जाहिर करण्‍यात येणार असून, तसे निर्देश अधीक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग, अहमदनगर यांना दिलेले आहेत. निवडणुकीच्‍या पूर्वतयारीबाबतचा आढावा घेण्‍यासाठी विभागीय आयुक्‍त नाशिक विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी हे दि.20 जून 2018 रोजी अहमदनगर जिल्‍हयाच्‍या दौ-यावर येणार आहेत. त्‍या दिवशी विभागीय आयुक्‍त निवडणुकीच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेऊन निवडणूक कामासाठी नियुक्‍त मतदान केंद्राध्‍यक्ष यांची बैठक सुध्‍दा घेणार आहेत.