आनंद संगीत विद्यालयाचा १०० टक्के निकाल
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज येथे एप्रिलच्या सत्रामध्ये पार पडलेल्या विविध सांगितिक परीक्षेत येथील आनंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केले, अशी माहिती विद्यालयाचे संचालक आनंदराव आढाव व संगीत शिक्षिका रेखा गायकवाड यांनी दिली.
प्रारंभिक परीक्षेत अश्विनी ननवरे, नैतिक निकुंभ, गौरी कोयटे, उत्कर्षा थोरात, आशू ससाने यांनी गायक व हार्मोनियम विषयात विशेष योग्यता संपादन केली. प्रवेशिका प्रथम परीक्षेत गायन हार्मोनियम या विषयात कल्याणी गंगवाल, ऋतुजा नजर, श्लोक कुदळे, अमृता सोनवणे, मीरा कदम, क्षितिजा घोलप, कोमल हिंगमिरे यांनी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत यश संपादन केले. मध्यमा प्रथम पूर्ण परीक्षेत गायन विषयात श्रेयस जाधव, सार्थक जोशी या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. आनंदराव आढाव व संगीत शिक्षिका रेखा गायकवाड यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास किर्लोस्कर, अॅड. बी. वाय. काळवाघे, अॅड. सी. एम. वाबळे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
