Breaking News

मुलगा होत नसल्याने सुनेला मारहाण


।संगमनेर/प्रतिनिधी।

‘तीन मुलीचं झाल्या, मुलगा होऊच शकत नाही’, असे म्हणत सासऱ्याने सुनेला शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दि. २१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास तालुक्यातील चंदनपुरी शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात पीडित महिला नंदा दीपक कढणे (वय ३० रा. आनंदवाडी, चंदनापुरी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सासरा सीताराम आंबू कढणे, अजित तुकाराम कढणे (दीर), शोभा अजित कढणे (भावजय) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार एम. बी. खान करीत आहेत.