Breaking News

अंकिता शिंगवी ‘एलएलबी’मध्ये प्रथम


अहमदनगर : येथील मनीष कलेक्शनचे संचालक किशोर चोपडा यांची विवाहित मुलगी अंकिता पियुष शिंगवी यांनी एलएलबी पोरीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. बी. कॉम.च्या पदवीनंतर त्यांनी येथील न्यू लॉ महाविद्यालयातून एलएलबी केले. सध्या त्या सी. एस. {कंपनी सेक्रेटरी}ची फायनल परीक्षेची तयारी करीत आहेत. मर्चन्टस बँकेचे संचालक माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्या त्या पुतणी आहेत. अंकिता शिंगवी यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल रमेश शिंगवी, सुनील शिंगवी, संजय शिंगवी, किशोर पितळे, फुलचंद चोपडा यांनी त्यांचे अभिनंदन केले.