पाऊलबुद्धे विद्यालयाचा ९७ टक्के निकाल
अहमदनगर : वसंत टेकडी येथील डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७. २० टक्के लागला. यामध्ये ओंकार मुतगेकर ८६ . ३०, शुभम पागिरे ८३. ८४ टक्के, आदित्य कांगुणे ९३ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा रोख रक्कम १ हजार रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य कल्पना लवांदे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन बी. आर. थोरवे यांनी केले. यावेळी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बेळगे यांनी आभार मानले.
