Breaking News

अभियांत्रिकी आणि एम. बी. ए. प्रवेश प्रक्रिया सुरु : कोल्हे


कोपरगाव शहर प्रतिनिधी : येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी व एम. बी. ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि. ०७ जून पासून अभियांत्रिकी व एम. बी. ए. प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. उमेदवारांच्या जातीनिहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्र व इतर माहितीसाठी या केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.