Breaking News

चंद्रकांत पाटकर विद्यालयात जागतिक योग दिन साजरा


डोंबिवली - चंद्रकांत पाटकर विद्यालय या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी गुरुवारी जागतिक योग दिवस साजरा केला. अथर्व जाधव याच्या बासरी वादनाच्या तालावर, शासनाच्या निर्देशानुसार दिलेली सर्व आसने विद्यार्थी वर्गाने तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र शुध्द पध्दतीने पूर्ण केली. सिध्दी व्यंकटेश व दिव्या प्रभू या विद्यार्थीनींनी सुत्र संचलन केले. 
योगदिवस जोंधळे शाळा समर्थ समाजाचे स. है. जोंधळे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय (मराठी माध्यमिक विभाग) येथे संस्थेच्या आजीवन सचिव वैशाली जोंधळे, संचालक सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे व मुख्य कार्यक ारी अधिकारी नरेंद् चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या संजीवनी खुळे, डा .बी. एन. वाघमारे, दशरथ मगर, विजयश्री मोकाशी, अरुणा राठोड, प्रतिभा ठाकूरदेसाई, कु. मीना प्रजापती, प्रतिभा शेपाळ या सर्व शिक्षक वृंदाच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांनी योगाची विविध आसने करुन जागतिक योग दिन साजरा केला.