Breaking News

दंडकारण्य अभियानात वटपौर्णिमे निमित्त 2500 वट वृक्षांचे रोपण


अहमदनगर - हरित सृष्टी सह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणार्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटवृक्ष लागवड सप्ताहात 27 जुन र्यंतच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर रोजी 2500 वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे यांनी दिली.
सह्याद्री विद्यालय येथे वटवृक्ष लागवड सप्ताहाची नियोजन बैठक मुख्य प्रवर्तक आ.डॉ.सुधीर तांबे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे तेरावे वर्ष आहे. आ. बाळा साहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्यप्रवर्तक आ. डॉ सुधीर तांबे व प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे व कांचन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे.वृक्षसंस्कृती जोपासणार्या या चळवळीने देशपात ळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे.प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे.यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे.भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा अस णार वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष,रुई,उंबर,पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सीजन निर्माण करतात. हिरवीगार सावली,परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सीजन मिळणार आहे. वटवृक्षाची सावली व थंडावा पशुपक्षांनाही आकर्षित करतो म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी 2500 वटवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे.वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे.प्रत्येक महिलेने एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे.घराच्या भोवती परसबाग लावून फळझाडे,फूलझाडे वाढवावी.येणार्या पिढीला चित्रातून झाडे दाखवि ण्याऐवजी प्रत्यक्ष त्या झाडाच्याच सावलीत खेळण्याचा आनंद मिळावा म्हणून दंडकारण्य अभियानात प्रत्येकाने सहभाग नों दवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरणार आहे.वटवृक्षाच्या रोपासाठी सर्व ग्रामपंचायतींनी वनविभाग,संगमनेर खुर्द यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांनी केले आहे.