Breaking News

मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपतर्फे अ‍ॅड. अमित महेता यांना उमेदवारी


मुंबई,  - भाजपने मुंबई पदवीधर मतदार संघातून अत्यंत तरूण आणि उच्च शिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्या आपल्या कार्यकर्त्याला तसेच मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्कासाठी न्यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून सुपरिचीत असणा-या अ‍ॅड. अमित महेता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशाप्रमाणे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी अ‍ॅड. महेता यांची उमेदवारी आज जाहीर केली.