Breaking News

वैष्णव चॅरिटेबल, मेडिकल ट्रस्टचा शुक्रवारी रौप्यमहोत्सवी सोहळा

मुंबई, दि. 21, जून - गेली पंचवीस वर्षे अखंडपणे पंढरपूरला जाणार्या आषाढी वारीत वारकर्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार्या वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टचा रौप्यमहोत्सवी सोहळा शुक्रवार दि. 22 जून 2018 रोजी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने आपल्या कार्याचे सिंहावलोकन करणार्या खरा वैष्णव या विशेषांकाचे आणि वेबसाईटचे प्रकाशनही केले जाणार आहे.
देहू येथील प्रसिध्द संत तुकाराज गाथा मंदिराचे संस्थापक तसेच आळंदी येथील वाङमय मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण श्री. पांडुरंग महाराज घुले यांच्या अध्यक्षतेखाली सायंक ाळी 5 ते 9 या वेळात होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विजय कासुर्डे यांनी दिली आहे. पंढरपूरच्या वारीत लाखो भक्त सहभागी होतात. पाऊस, थंडी, ऊन, वारा याचा विचार न क रता विठू नामाचा गजर करीत जाणार्या या वारकर्यांना प्रवासात आरोग्यविषयक अनेक अडचणी निर्माण होतात. पंचवीस वर्षापूर्वी वारकर्यांसाठी अशी कोणतीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. त्यांच्या या कष्टदायक वारीमध्ये आपलीदेखील सेवा रुजू व्हावी या उद्देशाने वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टने मोफत वैद्यकीय सहाय्य करण्याचा संकल्प सोडला आणि गेली पंचवीस वर्षे तो अव्याहतपणे चालू ठेवला. आता तर महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट, ओएनजीसी या संस्थांच्या मदतीने आदिवासी भागातही आठवड्यातून विशिष्ट दिवशी वैद्यकीय शिबीरेही भरवली जातात. लोकांच्या जनतेच्या सहाय्यानेच ट्रस्टकडे दोन सुसज्ज रुग्णवाहिकाही आहेत. जनसेवेसाठी समर्पित या आरोग्यसेवेचे महत्व लक्षात घेऊनच या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
यावेळी खरा वैष्णव या विशेषांकाचे प्रकाशन आ. भाई जगताप यांच्या हस्ते होणार असून वेबसाईटचा शुभारंभ आ. मनिष कुडाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ. सरदार तारासिंग, आ. जगन्नाथ शिंदे, आ. मोहनराव कदम, धर्मादाय आयुक्त श्री. शि.ग. डिगे, मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुमंत भांगे, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक विश्‍वनाथ पवार तसेच शिवसह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर वांगडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.