Breaking News

परशूराम वाघमारेकडूनच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एसआयटीच्या तपासातून स्पष्ट

गौरी लंकेश, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर
बंगळुरू /वृत्तसंस्था: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सहावा आरोपी परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आली असून त्यानेच लंकेश यांची हत्या केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात समोर आली आहे. एसआयटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांचाही खून एकाच हत्याराने झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, की वाघमारे याने गौरी लंकेश यांची हत्या केली असून गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतदेखील हेच हत्यार वापरल्याचे न्यायवैद्यक अहवालात स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांनी संबंधित गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार सापडले नसल्याचे सांगतानाच शरिरात आढळलेल्या गोळ्यांवरून बंदुकीचा प्रकार कळतो, असेही नमूद केले.
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झाली असून त्यानेच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने के ला आहे. वाघमारेने लंकेश यांच्यावर गोळया झाडल्या. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झाले आहे असे एसआयटीच्या अधिकार्‍याने सांगितले.तिघांच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आले ते अद्याप सापडलेले नाही. बंदुक सापडली नाही तरी शरीरात घुसलेल्या गोळीवरुन कुठली बंदुक असेल त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते असे एसआयटीच्या अधिकार्‍याने सांगितले.