Breaking News

प्रा.संदिप बेडसेंच्या प्रचारार्थ कासारे, पिंपळनेर नंदूरबार, मालेगावात शिक्षक मेळाव्यांचे आयोजन

धुळे - विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.संदिप बेडसे हे निवडणुक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारार्थ धुळे, नंदूरबार आणि मालेगाव येथे शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या दुसर्‍या फेरीत देखील संदीप बेडसे यांना मोठा पाठींबा मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, शेकाप व शिक्षक भारतीसह अनेक शैक्षणिक संस्था व संघटनांनी यापुर्वीच प्रा.संदिप बेडसे यांना पाठींबा जाहिर केला आहे. त्यातूनच उद्या 16 रोजी साक्री तालुक्याचे आमदार डी. एस. अहिरे, प्राचार्य बी. एस. पाटील यांनी सकाळी 9 वा. इंदिरा गांधी विद्यालय, निजामपूर येथे तर सकाळी 11 वाजा खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालय कासारे येथे शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले आहे. सायंकाळी 4 वाजता पिंपळनेर येथील इंदिरा गांधी विद्यालयात मेळावा होईल. नंदूरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही रविवारी 17 रोजी शिवाजी नाट्य मंदिरात सकाळी 11 वाजता तमाम शिक्षकांचा मेळावा आयोजित केला आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातल्या शिक्षकांचा मेळावा डॉ.अद्वय हिरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा रोडवर सोयगाव टेहरे चौफुली जवळ अमेय लॉन्स येथे रविवारी सायंकाळी 5 वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.