Breaking News

विष प्राशन करून आत्महत्या

नेवासा तालुक्यात कुकाणा येथे श्री संतनारायनगिरी महाराज बिगर शेती सहकारी पतसंस्था यांचेकडे पाथरवाला येथील राजेंद्र गवळी यांनी कर्ज प्रकरण केले होते. सदर पतसंस्थाचे व्हा.चेअरमन दत्तात्रय रामचंद्र खाटिक यांनी पाच लाख कर्ज मंजुर करून, दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडे दि.14 फेबु्रवारी 2018 रोजी गहान खत केले होते, त्याचबरोबर सातबारा फेरफार नोंदणी केली. व्हा. चेअरमन यांनी चेकवर सह्या घेऊन कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे राजेंद्र आसाराम गवळी यांनी आज रोजी दुपारी पतसंस्थेत जावून विष प्राशन केले. त्यामुळे पाथरवाला गावातील ग्रामस्थ व नातेवाईक कुकाणा पोलिस स्टेशनला गर्दी केली. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी नगरचे पोलिस प्रशासन उपस्थित झाले. श्री संत नारायनगिरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन दत्तात्रय खाटिक यांना ताब्यात घेऊन नेवासा पोलिस स्टेशनला रवाना केले व कर्जदार राजेंद्र गवळी याच्यावर नगर जिल्हा रूग्णालयात ताबडतोब हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.