Breaking News

वट पौर्णिमेच्या दिवशीच तब्बल 7 तोळे वजनाच्या सोन्याच्या गंठणावर धूम स्टाईलने डल्ला

सातारा, दि. 29, जून - शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एलआयसी कॉलनीत बुधवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील तब्बल 7 तोळे वजनाच्या सोन्याच्या गंठणावर धूम स्टाईलने आलेल्या दोघांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वट पौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, महिलांनी आज दिवसभरात अशा चोरट्यापासून सावध राहण्याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, वटपौर्णिमा असल्याने सकाळपासून महिलांची वडाचे झाड पुजण्यासाठी व दर्शनाला जाण्यासाठी गडबड सुरु आहे. एलआयसी कॉलनीतील महिलाही बुधवारी सक ाळी पुजेला निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा संशयितांनी एका महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रक ारामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.
या घडलेल्या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. संशयितांचे वर्णन घेऊन तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.