Breaking News

गौतम पॉलीटेक्निकच्या 67 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

कोपरगाव - तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये दि. 1 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात 67 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.


कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याहीवर्षी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये धूत ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड, आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन, भारत फोर्ज, देवगिरी फोर्जिंग प्रा. लिमिटेड, कल्याणी फोर्ज, मिंडा ग्रुप, औरंगाबाद ऑटो अन्सिलरीज आदी नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधींनी पात्रता धारक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये एकून 129 विद्यार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामुळे अल्पावधीतच गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देणारे केंद्र बनले आहे. शैक्षणिक वर्ष 2018/19 साठी सर्व विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 100 टक्के नोकरी देणारे संकुल अशी ख्याती मिळविलेल्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडे ओढा वाढत आहे. निवड करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आ. अशोक काळे, विश्‍वस्त युवा नेते आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव चैताली काळे, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्राचार्य सुभाष भारती यांनी अभिनंदन केले आहे.