एसटी महामंडळाकडून 1048 कर्मचारी बडतर्फ संपात सहभागी झाल्याचा कर्मचार्यांवर ठपका
नवी मुंबइ : एसटी कामगारांनी राज्यात पुकारलेल्या अघोषित संपामुळे एसटीमहामंडळाचे मोइया प्रमाणात नुकसान झाले होते, याविरूद्ध महामंडळाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून, तब्बल 1048 कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईत एक वर्षापूर्वी भरती झालेल्या कर्मचार्यांचा देखील समावेश क रण्यात आला आहे.
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्यांकडून दोन दिवसांचा अघोषित संप पुकारण्यात आला होता. या संपादरम्यान 372 कर्मचार्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर संपाच्या कालावधीत 93 बसचे नुकसानही झाले होते. यात एसटीत नव्याने दाखल झालेल्या 19 शिवशाहीचाही समावेश होता. तर संपामुळे एसटीचा 33 कोटी रुपयांचा महसूलही बुडाला होता. एसटी प्रशासनाने आठ आणि नऊ जून रोजी अघोषित संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना कारवाईचा दणका दिला आहे. पुकारल्याने या संपात सहभागी झालेल्या तब्बल 1 हजार 148 कर्मचार्यांना एसटी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. या निर्णयामुळे एसटी सेवेत नव्याने भरती झालेल्या तरुणांना घरी बसावे लागणार आहे. संप मागे घेण्यासाठी 9 जून रोजी एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह, अन्य संघटनांची बैठक झाली. यात वेतनवाढसंदर्भातील मागणी मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. मुंबईतील परळ आगारातील 38 एसटी कामगार, कुर्ला आगारातील 22, पनवेल आगारातील 18 कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विभागात एकूण 138 कामगारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिका-यांनी दिली. राज्यातील 1 हजार 48 कर्मचार्यांवर कारवाई केली. उर्वरित कर्मचा-यांवरही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कारवाई विरोधात काही संघटना न्यायालयात धाव घेणार आहेत.
