Breaking News

पालिकेला जीएसटी, मुद्रांक शुल्कापोटी 151 कोटी

पुणे : जीएसटी आणि एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारने जून महिन्यात 151 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यात जीएसटीचे 125 कोटी 57 लाख तर मुद्रांक शुल्क ाच्या दोन महिन्याच्या 25 कोटी 87 लाख रुपयांचा समावेश आहे.स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी बंद झाल्यापासून राज्य सरकारतर्फे पिंपरी महापालिकेला जीएसटीपोटी अनुदान देण्यात येते. गतवर्षी सरासरी 127 कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळत होते. यंदाच्या आर्थिक वर्षांपासून त्यात कपात करण्यात आली आहे.जून महिन्यात महापालिकेला 125 कोटी 57 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्याच्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी 25 कोटी 87 लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने वितरित केले आहे.