Breaking News

पुढील 48 तासात मुसळधार पावसाचे संकेत

मुंबईत शनिवारपासून जोरदार पाऊसाला सुरूवात झाली असली तरी, पुढील 48 तासांत देखील मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. अजून दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. पावसाच्या सरी कोसळल्यामुळे सायन ते माटुंगा आणि भांडुप, विक्रोळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरले होते. यामुळे काही वेळ जलद मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. तर धीम्या मार्गावरील लोकल अतिशय संथ गतीने सुरू होती.