Breaking News

लालूप्रसाद यादव यांच्या जामीनास 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

रांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 3 जुलैपर्यंत ही वाढ देण्यात आली आहे. लालू प्रसाद यांनी जामीनाच्या मुदतीमध्ये वाढ मिळविण्यासाठी रांची न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात 5 वर्षाची शिक्षा झाली आहे. यापूर्वी रांची उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना उपचारासाठी जामीन मंजूर केला होता. त्या दिवसापासून लालू प्रसाद यादव हे तुरूंगाबाहेर आहेत. मात्र, उपचारासाठी आणखी पुरेसा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे अंतरिम जामीनाची मुदत 6 आठवडे वाढवून द्यावी, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीनाची मुदत 3 जुलैपर्यंत वाढवली आहे. सध्या लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी याचिकेत आपण गंभीर आजारी असून मधुमेह, किडनीसह अन्य विकारांनी ग्रस्त असल्याचे म्हटले होते. लालू प्रसाद यादव यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.