Breaking News

दखल - शेतकर्‍यांची क्रूर थट्टा

भाजपला पूर्वी बनियांचा पक्ष म्हटलं जायचं. त्या वेळी तो व्यापार्‍यांचे हितसंबंध जपायचा. आता भाजप हा कुणाचा पक्ष राहिला आहे, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. द लित, मुस्लिम, शेतकरी भाजपच्या विरोधात आहेत. एक वर्षावर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. एका संस्थेनं तयार केलेल्या अहवालात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात 2013 पासून जशी वाातवरणनिर्मिती सुरू झाली होती, तशीच वातावरणनिर्मिती आता सुरू झाली आहे, असं म्हटलं आहे. 
...................................................................................................................................................
भाजपनं पूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही, म्हणून शेतकर्‍यांनी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारला आहे. सात तारखेपासून संप आणखी तीव्र केला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या संपात फूट पडली आहे आणि भाजप विरोधक दुबळे आहेत, ते सरकारला पर्याय देऊ शकत नाही, अशी सरकारमधील काहीची भूमिका आहे. नितीन गडकरी यांच्यासारखे नेतेही शेतीमालाचे भाव कमी असल्यानं शेतकर्‍यांचे हाल होत आहेत, हे एकीकडं मान्य करीत असताना दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचा मध्य प्रदेशमधील एक आमदार शेतकर्‍यांना बडवून काढण्याची भाषा करतो. शेतकर्‍यांना बेईमान ठरवतो. कृषिमंत्र्यांची जबाबदारी शेतकरी संपातून कसा तोडगा काढायची ही असताना त्यांनी तर शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळायचंच ठरवलं आहे. यापूर्वी मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकरी पैशासाठी आत्महत्या करतात, असं वक्तव्य केलं होतंं, तेव्हा त्यांना ते मागतील, तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवून आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं होतं. भाजपचे नेते शेतकर्‍यांविषयी किती असंवेदनशील आहेत, याचे एक एक नमुने गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले आहेत.
कर्जमाफी, दुधाला भाव, शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा संप सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकर्‍यांबाबत अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. मीडियातील चमकोगिरीसाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतो. आंदोलन करतो, आत्महत्या करतो. देशात कोट्यवधी शेतकरी असून त्यामधील ठरावीक शेतकरीच आंदोलन करत आहेत. या आंदोलनकडं जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही’, असं वक्तव्य त्यांनी पाटण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलं.
देशात सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी असंवेदनशील वक्तव्य करणार्‍या सिंह यांच्यावर विरोधकांना टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषिमंत्र्यांचा समाचार घेतला. सिंह साहेब कोणीही मीडियात कव्हरेज मिळावं, म्हणून मरत नसतो. लेकरांना दोन घास पोटभर देऊ न शकलेला, पोरांना शिक्षण देऊ शकत नसणारा आणि लेकीचं लग्न गरीबीमुळं करू न शकणारा कर्जबाजारी बाप गळ्यात फास अडकवून घेतो. त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. तुमच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त के लाय’, अशा शब्दांत सुळे यांनी सिंह यांच्यावर टीका केली आहे. देशभरातले शेतकरी सरकारच्या कृषी विरोधी धोरणाविरोधात संप करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अशात शेतकर्‍यांचं आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करून सिंह यांनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. राज्यातला आणि देशातला शेतकरी अडचणींचा सामना करतो आहे. त्याच्या उत्पादनांना योग्य हमीभाव नाही. आर्थिक अडचणीत तर कायमच सापडलेला आहे. अशा सगळ्या संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बळीराजाची कें द्रीय कृषिमंत्र्यांनी क्रूर थट्टा केली आहे.
गडकरी यांनी शेतकर्‍यांना त्यांचा संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न खरोखर गंभीर आहेत. त्या प्रश्‍नांवर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष आहे. केंद्राच्या प्रयत्नांमुळं शेतकर्‍यांना न्याय मिळेल असा विश्‍वास त्यांनी दिला असताना दुसरीकडे सिंह यांनी मात्र बेताल वक्तव्य केलं आहे. संपावर गेलेले शेतकरी आधीच संतप्त झाले असताना केंद्रीय कृ षिमंत्र्यांनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या संतापात भर घालणारं आहे. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य केलंं होतं. देशात आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार शेतकरी विरोधी वक्तव्य केली जात आहेत. कर्जमाफी करा, असं म्हणण्याची फॅशन झाली आहे, असं संतापजनक वक्तव्य तत्क ालीन केंद्रीय नगरविकास मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मतांवर डोळा ठेवून सात बारा कोरा करू, डा ॅ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीच्या सूत्रानुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल इतका हमी भाव देऊ अशी आश्‍वासनं लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक ीत देऊन सत्ता हस्तगत केली. आता मात्र त्याला छेद देण्याचं काम भाजपचे नेते करीत आहेत.
फडणवीस यांनी कर्जमाफी की कर्जमुक्ती असा शब्दछल करीत वेळकाढूपणा केला. त्याचबरोबर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी हमी कोण देणार आहे का? असं वक्तव्य केलं होतं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांना शेतकर्‍यांबाबत प्रश्‍न विचारला, तर ते चांगलेच भडकले होते. शेतकरी आत्महत्या काय आजच होतात का? त्या वैयक्तिक कारणांमुळे होतात, पुर्वीपासून होत आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्याअगोदर सरकारनं एवढी तूर खरेदी केली तरी रडतात साले’ असं बेताल वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. त्यावर त्यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली होती. दानवेंच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं होतं. त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंडही काढण्यात आली होती. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली असून जनताच ही नशा उतरवले, अशी प्रखर टीका विरोधकांनी केली, तर दानवे हे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं असून त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता, असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लगावला होता.