Breaking News

पणजीत 29 जून रोजी डाक अदालत


सांगली - भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन, पणजी यांच्या कार्यालयात आयोजित केली असून तक्रारी स्वीकारण्याचा अंतिम 15 जून आहे, ही माहिती डाकघर सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी दिली.
पोस्टाच्या कार्यपध्दती विषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. 
तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकार्‍यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादीचा स्प्ष्ट उल्लेख करुन मूळ अर्जाच्या प्रतीसह संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. जी. जे. मोंडे, सेक्रेटरी, डाक अदालत आणि सहायक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजी 403001 यांच्या नावे 15 जूनपर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी.