Breaking News

संपामुळे 15 कोटींचा महसूल बुडाला

एसटी कर्मचार्‍यांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे 15 कोटी रुपयाचे महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्केच बसच्या फेर्‍या सुटल्या. या संपाचा परिणाम मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हा संप जरी सुरू असला तरी राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 145 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तसेच राज्यातील 80 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही.