Breaking News

मुंबईत दमदार पावसाची हजेरी पहिल्याच पावसाच मुंबईतील व्यवस्थेचा उडाला बोजवारा

 मुंबई : मुंबईसह उपनगरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेच्या कामकाजांचा बोजवारा उडाला. ठिकठिकाणी पाणी तुंबले होते, त्यामुळे घराबोहर पडणार्‍या नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. सीएसएमटी, हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन, चुनाभट्टी मरिन ड्राईव्ह आणि माहिम परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. हे पाणी गुडघ्यापर्यत साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच या पावसाने हार्बर व पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून 10 ते 15 मिनिटे गाड्या उशिरा धावत आहेत. यामुळे सर्वसामान्य मुंबईकर आणि चाकरमानी यांना दैनंदिन कामकाज करणे अवघड झाले आहे. केरळमध्ये 29 मेलाच मान्सून दाखल झाला होता. यामुळे 8 जूनला महाराष्ट्राच्या काही भागात याचे परिणाम म्हणून पाऊस पडला. शनिवारी हा पाऊस मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
घाटकोपर भागात तर 100 मिलिमीटर पाऊस झाला. पण आता मुंबईतलं वातावरण सुखावह आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत आहे. एकूणच वीकेंड असल्यामुळे बहुतांश मुंबईकर एंजॉय करायच्या मूडमध्ये दिसतायेत. पण असं असलं तरी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. समुद्राच्या ठिकाणी फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवू नका. शनिवारी सकाळी मुंबईहून सुटलेली पहिली कसारा लोकल कुर्ला स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतरच्या खोपोलीपासून सर्व गाडया माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईसह उपनगरात वांदे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या भागात मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर, ठाण्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.