पुण्यात 15 श्वानांचा संशयास्पद मृत्यू
पुणे : हडपसरमधील म्हाडा कॉलनीजवळ काल (शनिवार) रात्री 15 श्वान मृतावस्थेत आढळून आले होते. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने श्वानांचा असा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत समजताच स्थानिक रहिवाशांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्व मृत श्वानांना शवविच्छेदणासाठी रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात श्वान मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या श्वानांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून कुणीतरी खाद्यपदार्थातून विष देऊन श्वानांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.