Breaking News

रेल्वे विभागाकडून मनपास करापोटी 12.51 कोटी येणे


सोलापूर - रेल्वे विभागाकडून मनपास करापोटी 12.51 कोटी येणे असून, याबाबत महापालिकेने रेल्वे विभागास वारंवार पत्र दिले. यापैकी 33.33 टक्के रक्कम देण्याची तयारी रेल्वे विभागाने दिली आहे. 4.17 कोटी रुपये देऊ, असे रेल्वे विभागाचे एस. के. जैन यांनी महापालिकेस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रेल्वे विभागाकडून मनपास 12.51 कोटी येणे आहे. त्यात सफाई पट्टी, पाणीपट्टी करांचा समावेश आहे. या थकीत कराची रकम मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी पत्रव्यवहार केला. रेल्वे व महापालिका अधिकारी यांच्यात बैठक झाली. रेल्वे विभागाने महापालिकेस एक जून रोजी पत्र पाठवून 33.33 टक्के रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. केंद्र सरकारच्या नियमानुसार ही रक्कम असून 4.17 कोटी रुपये भरण्याबाबत पत्र दिले. यापूर्वीही रेल्वेकडील थकीत कराची रक्कम वसुल करण्यासाठी मनपा पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले होते.