समता इंटरनॅशनल स्कुलचा 100 टक्के निकाल 98 टक्के गुण मिळवून आदित्य जिल्ह्यात प्रथम
सीबीएसई पॅटर्न शाळांचा इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, समता इंटरनॅशनल स्कुलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत, या स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला. समता इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी आदित्य संजय उंबरकर हा 98 टक्के गुण मिळवून अहमदनगर जिल्ह्यात सर्व सीबीएसई शाळांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालिका स्वाती कोयटे यांनी दिली. केवळ सहा वर्षांची परंपरा असतानादेखील अॅक्टिवीटी बेस शक्षण पद्धतिचा अवलंब करून समता स्कुलने महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. समता स्कुलच्या प्रीप्रायमरी विभागाची शिर्डी, श्रीरामपूर, वैजापूर येथे देखील शाखा सुरु करण्यात आलेली असून, या शाखांनादेखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
स्कुलची विद्यार्थीनी उन्नती मुथ्था हिने 97 टक्के गुण, यश बोरा 95 टक्के, अपूर्वा वाहूल 93 टक्के, ओम गोलेचा 92 टक्के, नेहा काळे 91 टक्के, तर वृषभ नाहाटा 90 टक्के अशा प्रकारचे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचा आदित्य उंबरळकर यास हिंदी विषयात तर उन्नती मुथा हीस सोशल सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण, समता इंटरनॅशनल स्कुलचे हॉस्टेलदेखील गत वर्षांपासून सुरु झालेले असून, अभ्यासपुर्ण असलेल्या होस्टेलचे विद्यार्थी प्रगतीपथावर आहे. यशश्वी विद्यार्थ्यांचे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मोहन झवर, राजकुमार बंब, रामचंद्र बागरेचा, संदीप कोयटे, प्राचार्या वर्षा देसाई, उषा मुर्ती, विलास भागडे आदींनी अभिनंदन केले.