30 वर्षीय तरूणाची आत्महत्या प्रकरण,सावकारांची नावे उघड आठवड्यापुर्वी घेतला होता गळफास
राहुरी / वि. प्रतिनिधी - तालुक्यातील आंबी येथे आठवडेभरापुर्वी 30 वर्षिय तरुणाने सावकारकीला कंटाळुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामध्ये आत्महत्या करणार्या तरुणाच्या नातेवाईकांना चार सावकारांची नावे समजली असुन, ही नावे पोलिस प्रशासनाकडे दिल्याची चर्चा होत आहे. सध्यातरी पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. आठवडे भरापुर्वी तालुक्यातील आंबी गावाच्या परिसरात सहादु महादु साळुंके या 30 वर्षीय तरुणाने गळफास घेवुन आत्महत्या केली होती. सहादु यास सावकाराकडुन वेळोवेळी दमबाजी करत व्याजाचे पैशाचा तगादा होत होता, या तगाद्याला कंटाळुन साहदुने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडुन बोलले जात आहे. घटना घडली असतांनाही सावकार या नातेवाईकांना दमबाजी करत असल्याचीही चर्चा या परिसरात होत आहे. यामध्ये चार सावकाराची नावे समोर आली आहेत, यामध्ये राहुरी फॉक्टरी येथिल एका चौकातील वैद्यकीत क्षेत्रात असलेला एक सावकार तसेच देवळाली परिसरातील अविनाश, दासु, प्रशांत, वैभव अशी नावे समोर आली असुन, सदर प्रकरणाने वेगळच वळण घेतले आहे. मयताच्या नातेवाईकांनी या सावकरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाला या सावकाराचे नावे मिळाली असुन, पोलिसांच्या रडारवर हे पाच सावकार दिसत आहेत. इतरही काही सावकार सध्या चर्चेत आले आहे. मयत तरुणाने या सावकारांपायी शेती विकली आहे. शेती विकुनही या सावकारांची पठाणी वसुली थांबत नसल्याने अखेर सहादु या तरुणाने जीवन यात्रा संपवण्याच्या निर्णय घेतला, मात्र त्याला पैशाचा तगादा कोण करत होत? त्याचे कोणाशी बोलने झाले? त्याला कोणत्या सावकाराने तगादा लावला? ते सावकार कोण? आलेले फोन कोणाचे? असे अनेक सवाल हमोर येत आहे.
राहुरी तालुक्यात देवळाली परिसरात असलेल्या सावकारांच्या जाचास कंटाळुन अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. या नव्या घटनेने देवळाली प्रवरा गाव पुन्हा एकादा चर्चेत आले आहे.
राहुरी तालुक्यात देवळाली परिसरात असलेल्या सावकारांच्या जाचास कंटाळुन अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. या नव्या घटनेने देवळाली प्रवरा गाव पुन्हा एकादा चर्चेत आले आहे.