अहमदनगर/प्रतिनिधी। नागपूर, भिस्तबाग, निर्मलनगर पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे कामे एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश महापौर कदम यांनी नुकतेच दिले आहे. यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे, आशाताई बडे, दिपाली बारस्कर, माजी सभागृहनेते अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनोज दुलम, राजेंद्र राठोड,माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अभियंता सोनटक्के, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठ्याचे एम.डी.काकडे, एम.जी.पी.चे चौधरी, अगरवाल आदी उपस्थित होते. यावेळी महापौर म्हणाल्या की, नागापूर, निर्मलनगर, भिस्तबाग, पाण्याच्या टाकीचे राहिलेली कामे एक महिन्यामध्ये पूर्ण करण्याबाबत एजन्सी यांना सक्त सुचना केली असून कामाच्या टिम वाढविण्याबाबत सांगितले आहे. त्यांनी कामामध्ये सुधारणा केली नाही तर कडक कारवाई करण्यात येईल. उपनगरामध्ये वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नागापूर, बोल्हंगाव येथे सुध्दा पाण्याची समस्या लवकर मार्गी लागेल. तसेच तीन दिवसांनी एमजीपीने कामाचा अहवाल महापौर कार्यालयाकडे सादर करावा असे त्या म्हणाल्या.